Lok Sabha Election 2024 – भाजपची आणखी एक यादी जाहीर; रीटा बहुगुणा, किरण खेर यांचं तिकीट कापलं

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत नऊ जणांची नावं असून त्यातील सात जागा उत्तर प्रदेशमधील आहेत. तर उर्वरित दोन जागांवरील जुन्या उमेदवारांचं तिकीट कापण्यात आलं आहे. यात रीटा बहुगुणा जोशी आणि किरण खेर यांचा समावेश आहे.

चंदिगढमधून किरण खेर यांच्या ऐवजी संजय टंडन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रीटा बहुगुणा जोशी यांच्याऐवजी अलाहाबादहून नीरज त्रिपाठी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंदिगढमध्ये 2014 आणि 2019 या दोन्ही वेळी किरण खेर या उमेदवार होत्या आणि दोन्ही वेळा त्या विजयी झाल्या होत्या. तरीही त्यांचं तिकीट यंदा कापलं गेलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडून मैनपुरी मतदारसंघात जयवीर सिंह ठाकूर, कौशाम्बीमधून विनोद सोनकर, फूलपूरमधून प्रवीण पटेल, अलाहाबादमधून नीरज त्रिपाठी, बलियामधून नीरज शेखर, मछलीनगरमधून बीपी सरोज आणि गाझीपूरमधून पारसनाथ राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रीटा यांच्या ऐवजी ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, ते नीरज त्रिपाठी हे माजी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांचे पुत्र आहेत.