सेक्स नाही एग्ज! महुआ मोइत्रा यांनी ट्रोल आर्मीला दिला दणका

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सध्या निवडणुकांचे सत्र सुरू असल्यामुळे त्या पश्चिम बंगालमधील कृष्णनगर मतदारसंघात निवडणूक प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यानचा महुआ मोईत्रा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला महुआ यांनी दिलेल्या उत्तराने त्या चर्चेत आल्या आहेत.

महुआ मोईत्रा खुल्या जीपमधून निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या एका पत्रकाराने त्यांना विचारले ‘तुमच्यात इतका उत्साह कसा काय? यावेळी महुआ मोईत्रा यांनी दिलेल्या उत्तरामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. यावेळी त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून ‘सेक्स’ हा शब्द बोलल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच त्या पत्रकाराने स्वतः सोशल मीडिया अकाउंटवरून ट्विट करून एक पोस्ट केली. ‘मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की, महुआ मोईत्रा यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर ‘सेक्स’ नसून ते ‘एग्ज’ (अंडी) असे दिले आहे. महुआ मोईत्रा यांच्या व्हिडिओशी छेडछाड करून तो व्हायरल केला जात आहे. त्यामुळे व्हायरल झालेला व्हिडिओ हा खोटा आहे’, असे त्या पत्रकाराने स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावरील युजर्स पत्रकाराच्या ट्विटवरून प्रश्न उपस्थित केले आहेत. एका युजरने ट्विट केले आहे की, “हे तुमच्या चॅनेलचे स्क्रीन रेकॉर्डिंग आहे. ‘अंडी’च्या उत्तरावर तुम्ही इतके का हसाल? तुम्ही हसल्यावर महुआंनी लगेचच ‘हे खरे आहे’, असे म्हटले आहे. “मग तुम्ही तिच्या ‘अंडी’ उत्तरावर का हसत आहात.”, असा सवाल आणखी एका युजरने केला आहे.