पुण्यात भाजपमधील नाराजीनाटय़ सुरूच, बी फॉर्म देईपर्यंत लोकसभेसाठी इच्छुक

sanjay-kakade-mp-bjp

लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपमध्ये सुरू झालेली अंतर्गत धुसपूस अद्याप सुरूच आहे. त्यांच्या उमेदवारीवर भाजचेच नेते संजय काकडे यांनी नाराजी व्यक्त केली असून पुण्याच्या उमेदवारीवर मी शंभर टक्के नाराज आहे. पक्षाकडून बी फॉर्म देईपर्यंत मी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले.

काकडे म्हणाले, मी उमेदीची दहा वर्षे पक्षाला दिली आहेत. पुणेकर जनतेपर्यंत मी पोहचलो आहे. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारीवर मी शंभर टक्के नाराज आहे. पुणे लोकसभेसाठी मी इच्छुक आहे आणि माझी नाराजी ही नैसर्गिक आहे. मात्र मी उमेदवार बदलाची कुठलीही मागणी करणार नाही. मी इच्छुक होतो, आजही आहे. जिल्हाधिकाऱयांकडे पक्षाकडून बी फॉर्म जात नाही तोपर्यंत मी इच्छुक आहे.