भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांना कर्नाटक पोलिसांनी घेतले ताब्यात…जाणून घ्या कारण….

कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये अजान आणि हनुमान चालीसा यावरून सुरू झालेला वाद वाढण्याची चिन्हे आहेत. अजानच्यावेळी मोठ्या आवाजात गाणे लावल्याने रविवारी एका दुकानदाराला मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये भाजप खासदार तेजस्वी सूर्या सहभागी झाले होते. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, यासाठी कर्नाटक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सूर्या यांनी आंदोलकांना माघारी जाण्यास सांगितले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. अजानाच्या वेळी एका दुकानदाराने मोठ्या आवाजात गाणे लावले होते. त्यावरून दुकानदाराला मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर बंगळुरुमध्ये अजान आणि हनुमान चालीसा असा वाद पेटला आहे. या आंदोलनात सहभागी झाल्याने पोलिसांनी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांना अटक केली