Naveen Polishetty Accident – साऊथच्या सुपरस्टार अभिनेत्याचा अमेरिकेत अपघात, हाताला दुखापत

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता Naveen Polishetty याचा अपघात झाला आहे. या अपघातात त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अभिनेता नवीन याने अद्याप याबद्दल खुलासा केला नसला तरी त्याच्या टीमने याबाबत माहिती दिली आहे.

अमेरिकेतील डेलास येथे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले. थांबण्याचा प्रयत्न करून ही तोल गेल्याने दुचाकी घसरली. त्यामुळे नवीनच्या हाताला दुखापत झाली. या दुखापतीनंतर नवीन अमेरिकेतच असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

नवीन पॉलिशेट्टीचा महेश बाबू दिग्दर्शित मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये मुख्य भूमिकेत अनुष्का शेट होती. चित्रपटाला चांगले रिव्ह्यू मिळाले तसेच त्याच्या अभिनयाचे ही भरपूर कौतुक झाले. मात्र यानंतर नवीन बराच काळ गायब होता.