माणुसकीला काळीमा ! दहा किलोचे मटण द्या तरच अंत्यसंस्कार, दोन दिवस मृतदेह पडून राहिला

ओ़डीशामध्ये माणूसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. 10 किलो मटणाची अट पूर्ण न केल्याने एका वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारात गावकऱ्यांनी सहभागी होण्यास नकार दिला. महिलेच्या घरची हलाखीची परिस्थिती असल्याने त्यांना एवढ्य़ा किलोचे मटण देणे परवडणारे नव्हते. अखेर महिलेच्या मुलाने दोन दिवस कशीबशी मटणाची व्यवस्था केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ओडीशाच्या या गावात अंत्यसंस्काराच्या वेळी सामूहिक मेजवानी देण्याची परंपरा आहे. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने मृत महिलेच्या मुलाला सामुहीक जेवणाची व्यवस्था करता आले नाही. शिवाय अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी गावकऱ्यांनी 10 किलो मटणाची अट घातली होती. हलाखीची परिस्थिती असल्याने त्याला 10 किलो मटणाची व्यवस्था करायला दोन दिवस लागले. अखेर दोन दिवस तो मृतदेह तसाच पडून मटणाची व्यवस्था झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना मयूरभंजच्या तेलाबिया येथील आहे. येथे राहणारे 70 वर्षीय सोंबरी सिंह यांचे निधन झाले. गावात लग्न आणि मृत्यू यांसारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांवर सामूहिक मेजवानी देण्याची प्रथा आहे. मृत महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मेजवानी देण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. गावकऱ्यांनी मेजवानी म्हणून 10 किलो मटणाची मागणी केली होती, जी तो देऊ शकला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी अंत्यसंस्कारात सहभागी होण्यास नकार दिल्याने अंतिम संस्कार प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला.

याप्रकरणी ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सोम्बारी यांच्या कुटुंबात आधी दोन लग्न झाली. मात्र त्यावेळीही कोणाला सामुहीक भोजन देण्यात आले नव्हते. ग्रामस्थांना या गोष्टीचा राग मनात होता. शनिवारी सोम्बारी यांचे निधन झाले, गावात मृत्यू झाल्यानंतर सामुहीक भोजन देण्याची परंपरा आहे. त्यांनी सांिगतले की सोम्बारी कुटुंबाकडून आधीही कोणती दावत दिली नव्हती. त्यामुळे आता ग्रामस्थांनी 10 किलो मटणाची अट ठेवली.