नागरिकांची आर्थिक फसवणूक करून महागडय़ा मोबाईलची खरेदी

आँनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून नागरिकांना सहज चूना लावयचा. मग फसवणुकीच्या पैशातून महागडे मोबाईल खरेदी करायचे आणि ते मोबाईल वेगवेगळ्या मध्यस्तांकरवी विकून पैसा कमावयचा, अशाप्रकारे पद्धतशीर झोल करून आपला खिस्सा भरणाऱ्या एका रँटेकचा ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका भामट्याला बेड्या ठोकून त्याच्याकडून सात नवीन महागडे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

वरळी येथे राहणारा संकेत बडे याची आर्थिक फसवणुक झाली होती. अहमदाबाद येथे जायचे असल्याने संकेत भाड्याने गाडी बघत होता. त्यासाठी तो गुगलवर सर्च करत असताना त्याला महादेव कार रेंटल डाँट काँम हे संकेतस्थळ दिसले. त्या संकेतस्थळावर हवी ती गाडी तसेच आवश्यक माहिती भरल्यानंतर त्याने क्रेडीट कार्डाची माहिती भरल्यानंतर त्याला पेमेंट एरर असा संदेश आला. त्यावेळी समोरून संकेतच्या व्हाँट्सअपवर एक लिंक आली. ती लिंक डाऊनलोड करून त्यात सर्व माहिती भरल्यावर देखील पुन्हा पेमेंट एररचा संदेश आला. थोडावेळाने संकेतच्या क्रेडीट कार्डवरून एक लाख 79 हजार 900 रुपये डेबिट झाल्याचा त्याला संदेश आला. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच संकेतने ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक अरविंद चंदनशिवे, पोलिस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नौशाद तांबोळी तसेच वाडते, गायकवाड,पगारे, पाटकर, सोनवणे, मुंडे, परब, अमोल पाटील या पथकाने तपास सुरू केला.

फिनिक्स माँलमध्ये आयफोनची खरेदी

पथकाने माहिती काढली असता संकेतच्या पैशाने लोअर परळच्या फिनिक्स मॉल येथून आयफोन 15 प्रो मॅक्स हा मोबाईल खरेदी केलाअसल्याचे समजले. सेजान सय्यद या डिलेव्हरी बाँयने तो मोबाईल ताब्यात घेतला होता. त्यामुळे त्याच्याकडे चौकशी केल्यावर बीकेसीच्या भारत नगरात राहणाऱ्या सुरज निर्मल याला मोबाईल दिल्याचे कळले. सुरजकडे चौकशी केल्यावर त्याने त्याचा भाचा नारायण निर्मलकडे तो मोबाईल दिल्याचे सांगितले. इथे येऊन तपास थांबला. दरम्यान तो मोबाईल राजस्थानच्या केळवा येथे सुरू होताच पोलिसांनी तेथे जाऊन नारायण तेली या मोबाईल धारकाला गाठले व तो मोबाईल हस्तगत केला. तेव्हा ठाण्यात राहणाऱ्या आदित्य तेली याच्याकडून मोबाईल घेतल्याचे त्याने सांगितले.