3 एप्रिलला महाविकास आघाडीची मोठी घोषणा… संजय राऊत यांची माहिती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी दुपारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 3 एप्रिलला महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते पत्रकार परिषद घेणार अससल्याची माहिती दिली. तसेच लवकरच उद्धव ठाकरे व शरद पवार दिल्लीत जाणार आहेत मात्र तिथे इथल्या जागावाटपावर चर्चा होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडीबाबत पत्रकारांनी विचारले असता संजय राऊत यांनी म्हणाले, ”आम्ही कायम बाळासाहेब आंबेडकरांना सन्मानजनक वागवलं आहे. त्यांना अकोल्यासह चार जागांचा प्रस्ताव होता. त्यात आम्ही आमची रामटेकची विद्यमान जागाही द्यायला तयार होतो. काँग्रेसकडून एक चांगली जागा दिली जात होती. जे संविधान खत्म करतायत त्यांना अप्रत्यक्ष मदत करू नये. वंचित बहुजन आघाडीत आमच्यासोबत असायला हवी ही आमची भूमिका आहे. शिवसेना आणि वंचितची युती आधी झालेली होती. बाळासाहेब आंबेडकरांबाबत कोणताही किंतू परंतू आमच्या मनात नाही. ते मोठे नेते आहेत. आतापर्यंत खेळीमेळीत चर्चा झालेली आहे. अखेरपर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे कुणीही मविआमधून खोटं बोलत नाही. तिसऱ्या आघाडीने आमची चिंता आमची वाढेल असे वाटत नाही. या देशातील देशातील जनतेने संविधानाविरोधात जे आहेत त्यांच्या पाठिमागे उभं राहायचं नाही असं ठरवलं आहे. 3 तारखेला आमची पत्रकार परिषद आहेत. त्या पत्रकार परिषदेत सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील”

गोविंदाच्या मिंधे गटातील एन्ट्रीवरूनही संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ”गोविंदा जेव्हा काँग्रेसकडून निवडणूक लढत होता तेव्हा भाजपचे उमेदवारी राम नाईक यांनी त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. आता त्याच गोविंदाने भाजपच्या मित्र गटात प्रवेश केलाय. बघू आता यावर भाजपची काय प्रतिक्रीया असेल, असे संजय राऊत म्हणाले.