शरद पवारांना दिलासा, अजित पवार गटाला झटका; सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाला झटका दिला आहे. ‘अजित पवार यांना निवडणूक आयोगाने दिलेल्या घड्याळ या चिन्हाविरोधातील खटला न्याप्रविष्ठ असल्याचे त्यांनी एक नोटीस काढून सांगायचे आहे. तसेच त्यांच्या प्रचारांच्या जाहीरातीत देखील त्यांना सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचा उल्लेख करावा लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणीदरम्यान शरद पवार यांच्या पक्षाला दिलासा दिला आहे. न्यायालायने निवडणूक आयोगाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह इतर कुणालाही न देण्याचे आदेश दिले आहेत. तुतारी हे चिन्ह येत्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाकडेच राहिल असे आदेश न्यायालयाने दिले.

दरम्यान घड्याळ या चिन्हाबाबतची राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यासोबतच त्यांनी अजित पवार गटाला काही आदेश दिले आहेत. ‘घड्याळ या चिन्हावरून सध्या न्यायालयात खटला सुरू आहे. त्यामुळे तुम्ही ज्या काही जाहीराती देता त्यात या खटल्याचा उल्लेख असायला हवा., तसेच अजित पवार गटाने मराठी, हिंदी व इंग्लिश या भाषांमध्ये नोटीसा काढून घड्याळ या चिन्हाबाबात खटला सुरू असल्याची माहिती मतदारांना द्यायची आहे’ असे आदेश दिले.