नऊ लिंबांची किंमत दोन लाख 36 हजार!

तामीळनाडूच्या विल्लुपुरम जिह्यात असलेल्या भगवान मुरुगाच्या मंदिरात भाल्याला लावण्यात आलेल्या लिंबांचा मंगळवारी लिलाव करण्यात आला. या वेळी नऊ लिंबे तब्बल दोन लाख 36 हजार रुपयांत विकली गेली. या लिंबांच्या रसाचे सेवन केल्यास वंधत्व दूर होते, तसेच उद्योगधंद्यात समृद्धी येते अशी अंधश्रद्धा आहे.

तामीळनाडू येथील विल्लुपुरम जिह्यात असलेल्या भगवान मुरुगनच्या मंदिरात दरवर्षी पांगुनी उत्तरम उत्सवात भगवान मुरुगाचे दर्शन घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात लोक येत असतात. मंदिरात असलेल्या पवित्र भाल्याला लिंबू अर्पण केले जातात. देवाला अर्पण करण्यात आलेल्या या लिंबांचा नंतर लिलाव करण्यात येतो. यंदा लिंबू खरेदीला गर्दी झाली. यंदा नऊ लिंबू हे तब्बल दोन लाख 36 हजार रुपयांना खरेदी केले.

N भगवान मुरुगाच्या भाल्याला जोडलेल्या लिंबूमध्ये जादूची शक्ती आहे, अशी अंधश्रद्धा पसरली आहे. हे मंदिर विल्लुपुरमच्या तिरुवनेनल्लूर गावात दोन टेकडय़ांच्या संगमावर वसलेले आहे.

N या छोटय़ा मंदिरात भगवान मुरुगाचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून लोक येतात. तसेच संतती प्राप्तीसाठीदेखील देवाला साकडे घातले जाते.

N देवाचा उत्सव नऊ दिवस चालतो. मंदिराचा पुजारी रोज एक लिंबू देवाच्या भाल्यातून काढतो.