कर थकबाकीदारांवर रत्नागिरी नगरपरिषदेची कारवाई सुरू, आतापर्यंत 98 मालमत्तांना टाळे ठोकले

रत्नागिरी नगरपरिषदेने घरप‌ट्टी वसूलीची मोहिम हाती घेतली आहे. नगरपरिषदेचा कर थकवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. या मोहिमेंतर्गत घरप‌ट्टी थकबाकीदारांच्या 98 मालमत्तांना टाळे ठोकण्यात आले आहे. घरप‌ट्टी थकवणाऱ्यांच्या 77 नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या नेतृत्वाखाली घरप‌ट्टी वसूलीकरीता 8 पथके तयार करण्यात आली आहेत. या 8 पथकांमार्फत शहरात घरोघरी जाऊन करवसूली सुरु आहे. रत्नागिरी नगर परिषदेचे कर वसूलीचे 14 कोटी रुपयांचे ध्येय आहे. आतापर्यंत 7 कोटी 35 लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. शहरात चारचाकी गाडी फिरवून मालमत्ताधारकांना कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कर थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आता असून आतापर्यंत 98 मालमत्तांना टाळे ठोकण्यात आले आहे. तसेच कर यकबाकीदारांची नळजोडणी तोडण्यात येत आहे. आतापर्यंत 77 जणांच्या नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत.