पुन्हा मालवणी धुमशान… सेलिब्रेटी कलाकारांच्या संचात ‘वस्त्रहरण’चा 5255 वा प्रयोग

मराठी माणूस आणि नाटक यांचे अतूट नाते आहे. त्यातही मालवणी नाटक म्हणजे दुधात साखर. दिवंगत मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी बोलीभाषेतून ‘वस्त्रहरण’ हे नवेकोरे नाटक रंगभूमीवर आणून रंगमंच आणि रसिकांसाठी मनोरंजनाचे आगळेवेगळे नवे दालन खुले केले. 16 फेब्रुवारी 1980 रोजी ‘वस्त्रहरण’चा पहिला प्रयोग झाला. त्याला 44 वर्षे झाली आहेत. त्यानिमित्ताने भद्रकाली प्रॉडक्शन्स सेलिब्रेटी कलाकारांच्या संचात रंगमंचावर 44 मोजकेच प्रयोग सादर करणार असून लवकरच प्रयोग क्रमांक 5255 सादर होणार आहे. पुन्हा एकदा मालवणी धुमशान पाहायला मिळणार आहे. मालवणी भाषेवर प्रेम करणाऱया आणि ‘वस्त्रहरण’ नाटकाच्या चाहत्यांसाठी ही खास पर्वणी असेल.