साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 10 मार्च ते शनिवार 16 मार्च 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – कराराची घाई नको

मेषेच्या व्ययेषात सूर्य, एकादशात मंगळ. तुम्ही केलेली टीका टिप्पणी योग्य असली तरी तुमच्यावर एखादा आरोप टाकला जाऊ शकतो. नोकरीच्या कामात सावध रहा. धंद्यात व व्यवसायात लाभ होईल परंतु कराराची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दगदग, धावपळ होईल. लोकप्रियता टिकवता येईल. कायदा पाळा.

 शुभ दिनांक : 13, 16

वृषभ – नवे परिचय उत्साहवर्धक

वृषभेच्या एकादशेत सूर्य, दशमात मंगळ. सप्ताहाच्या मध्यावर क्षुल्लक तणाव जाणवेल. कायदा पाळा. नोकरीच्या कामात प्रभाव राहील. नवे परिचय उत्साहवर्धक ठरतील. धंद्यात तेजी जाणवेल. वसुली, लाभ होईल. राजकीय, सामाजिक कार्याला नेटाने पुढे नेता येईल. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. लोकसंग्रह वाढेल. तुमच्या क्षेत्रात प्रेरणादायक वातावरण राहील.

शुभ दिनांक : 11, 16

मिथुन – कामात प्रगती होईल

मिथुनेच्या दशमेषात सूर्य, भाग्येषात मंगळ. सप्ताहाच्या शेवटी तणाव, चिंता जाणवेल. नोकरीच्या कामात प्रगती होईल. नवा बदल शक्य. धंद्यात वाढ होईल. नवे कंत्राट मिळेल. कर्जाचे काम करा. थकबाकी मिळवा. नवे परिचय फायदेशीर ठरतील. राजकीय, सामाजिक कार्याला मेहनतीने पूर्ण करा. प्रतिष्ठा, लोकप्रियता लाभेल.

शुभ दिनांक : 11, 13

कर्क – प्रवासात सावध रहा

कर्केच्या भाग्येषात सूर्य, अष्टमेषात मंगळ. जवळच्या व्यक्तीसोबत वाद, तणाव जाणवेल. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत कठीण कामे कराल. धंद्यात फसगत टाळा. नवीन ओळख फसवी ठरेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. व्यसन, मोह टाळा. अधिकार लाभतील.

शुभ दिनांक : 11, 13

सिंह – शब्द जपून वापरा

सिंहेच्या अष्टमेषात सूर्य, सप्तमेषात मंगळ. प्रकृतीची काळजी घ्या. शब्द जपून वापरा. कायदा सर्वत्र पाळा. नोकरीत अरेरावी नको. चूक टाळा. धंद्यात सौम्य शब्दात बोला. लाभ होईल. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी, अडथळे येतील. कुणालाही कमी लेखू नका. नवे परिचय उत्साहवर्धक ठरतील. संसारात क्षुल्लक तणाव जाणवेल.

शुभ दिनांक : 15, 16

कन्या – मैत्रीत दुरावा निर्माण होईल

कन्येच्या सप्तमेषात सूर्य, षष्ठात मंगळ. मैत्रीत, नात्यात गैरसमज, दुरावा निर्माण होईल. नोकरीत कामाचा ताण असला तरी प्रभाव राहील. धंद्यात सतर्क रहा. वाद वाढवू नका. राजकीय. सामाजिक क्षेत्रात जवळच्या व्यक्तीला दुखवू नका. अहंकाराची भाषा नुकसानकारक. कौटुंबिक खर्च वाढेल. चेष्टामस्करी त्रासदायक ठरेल.

शुभ दिनांक : 15, 16

तूळ – तडजोड करावी लागेल

तुळेच्या षष्ठेशात सूर्य, पंचमेषात मंगळ. कामात अडचणी, अडथळे येतील. तडजोड करावी लागेल. नोकरीत सौम्य धोरण ठेवा. सहनशीलता वाढवा. धंद्यात वाढ होईल. दगदग होईल. राजकीय, सामाजिक कार्यात मत प्रदर्शित करण्याची घाई नको. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. स्वतवर नियंत्रण ठेवा. जवळच्या व्यक्ती मदत करतील. कायदा पाळा.

शुभ दिनांक : 13, 14

वृश्चिक – धंद्यात अरेरावी नको

वृश्चिकेच्या पंचमेषात सूर्य, चतुर्थात मंगळ. कुटुंबात गैरसमज, वाद येतील. नोकरीच्या ठिकाणी संयम बाळगा. प्रभाव राहील. धंद्यात अरेरावी नको. गोड बोला. राजकीय, सामाजिक कार्यातील त्रुटी समजून घेता येतील. नव्या कामात प्रगती होईल. प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक व्यवहारात सावध रहा. फसगत टाळा. नव्या परिचयावर भाळू नका.

शुभ दिनांक : 11, 16

धनु – कामाचा व्याप वाढेल

धनुच्या चतुर्थात सूर्य, पराक्रमात मंगळ. प्रेरणादायक वातावरण. उत्साह वाढेल. सप्ताहाच्या शेवटी शब्द जपून वापरा. चूक टाळा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. धंद्यात वाढ होईल. लाभ होईल. राजकीय, सामाजिक कार्यात धावपळ होईल. तडजोड करावी लागेल. प्रतिष्ठेचा मोह ठेवू नका. लोकप्रियता मिळेल. घरगुती कामे होतील. खरेदीविक्रीत लाभ होईल.

शुभ दिनांक : 13, 14

मकर – कार्याला नवी दिशा मिळेल

मकरेच्या पराक्रमात सूर्य, धनेषात मंगळ. अनेक कामांना गती मिळेल. कठीण प्रश्न सोडवण्याचा मार्ग शोधाल. मित्र, नातलग मदत करतील. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. धंद्यात नवे काम मिळेल. कर्जाची व्यवस्था करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याला नवी दिशा मिळेल. ओळखी वाढतील. उत्साहवर्धक वातावरण राहील.

शुभ दिनांक : 11, 16

कुंभ – प्रगतीची संधी मिळेल

कुंभेच्या धनेषात सूर्य, स्वराशीत मंगळ. प्रत्येक दिवस उत्साहाचा व आत्मविश्वासाचा वाटेल. नोकरीत कठीण कामे करून दाखवाल. प्रगतीची संधी मिळेल. घंद्यात वाढ होईल. नवे कंत्राट मिळवाल. राजकीय, सामाजिक कार्याला योग्य वळण देता येईल. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. लोकप्रियता वाढेल. जनहिताचे कार्य करा. घरगुती व्यवहार पूर्ण करा.

शुभ दिनांक : 11, 13

मीन – अनाठायी खर्च टाळा
स्वराशीत सूर्य, व्ययेषात मंगळ. अतिशयोक्तीपूर्ण कोणतेही कृत्य टाळा. मैत्रीत, नात्यात तणाव जाणवेल. वाद, गैरसमज उद्भवतील. नोकरीत सहनशीलता ठेवा. धंद्यात परिस्थिती सावरून घ्या. चूक टाळा. अनाठायी खर्च टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सर्वांच्या मतानुसार निर्णय घ्या. मनस्ताप होणारे प्रसंग घडतील. प्रवासात धोका जाणवेल. कायदा पाळा.

शुभ दिनांक : 15, 16