शिकाऊ डॉक्टरांना 18 हजार विद्यावेतन द्या

महाराष्ट्र शासनाने 27 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासितांसाठी विद्यावेतन 11000 वरून 18000 इतके करण्यात आले आहे. परंतु महापालिकेच्या महाविद्यालयातील आंतरवासितांना अद्यापही 11000 प्रतिमहा इतकेच वेतन मिळत आहे. त्यामुळे पालिकेच्या शिकाऊ डॉक्टरांना 18 हजार रुपये विद्यावेतन द्या, अशी मागणी डॉक्टरांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिकेच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांकडून एक सामायिक पत्र पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांना देण्यात आले आहे.