देशातील तरुणांना मोहन भागवत यांच्या ‘सर्टिफिकेट’ची गरज नाही, प्रियंका गांधी यांनी सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मुंबईत Gen Z आणि Gen Alpha पिढीतील तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलक ‘जेन-झी’ ऑण्टिनॅशनल नाहीत, असे मत मांडले. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी भागवतांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.

राजधानी दिल्लीत संसद भवन परिसरात प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, देशातील तरुणांना आरएसएस प्रमुख मोहन भागवत जी यांच्याकडून कोणत्याही सर्टिफिकेटची गरज नसल्याचे त्यांनी सुनावले.

दरम्यान, कर्नाटकचे मंत्री व काँग्रेस नेते प्रियांक खरगे यांनी देखील भागवत यांच्या वक्तव्यावर टीका केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की, आरएसएस आणि भाजप त्यांची भाषा बदलण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांची विचारसरणी बदलत नाही. लोकांमध्ये फूट पाडणे आणि द्वेष नव्या स्वरूपात मांडणे हाच त्यांचा उद्देश असल्याचा घणाघात प्रियंका गांधी यांनी केला.

आंदोलक ‘जेन-झी’ ऑण्टिनॅशनल नाहीत!- मोहन भागवत

‘लोकशाहीमध्ये आंदोलन हा एखाद्या मुद्द्यावर सहमती घडवून आणण्याचा एक मार्ग आहे. त्यात चुकीचे काही नाही. आपल्याकडे जेन-झी तरुणांनी केलेले आंदोलन हे त्यांना झालेल्या त्रासाविरुद्ध होते. त्यामुळे ते अण्टिनॅशनल ठरत नाहीत,’ असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले.

सरसंघचालक म्हणतात आंदोलक ‘जेन-झी’ ऑण्टिनॅशनल नाहीत!