दुष्काळावर शिवसेना आक्रमक; अध्यादेशाची होळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या वणव्यात होरपळून निघत आहे. चोहोबाजूने मदतीसाठी आक्रोश होत असताना राज्य सरकारने अध्यादेश काढून हात वर केले. प्रत्यक्षात मदत कधी देणार, याबद्दल सरकारने अवाक्षरही काढले नाही. सरकारच्या या उदासीन धोरणाच्या निषेधार्थ सोमवारी मराठवाड्यात ठिकठिकाणी अध्यादेशाची होळी करण्यात आली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पाहणीचे सोपस्कार आटोपल्यानंतर शनिवारी दुष्काळाची अधिसूचना काढण्यात आली. राज्यातील 265 तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले. राज्य सरकारने दुष्काळाची अधिसूचना काढली असली तरी प्रत्यक्ष शेतकऱयांना किती आणि केव्हा मदत देणार हे अद्यापही स्पष्ट केले नाही. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मराठवाडय़ात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर अध्यादेशाची होळी करण्यात आली.