स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट येत्या 22 मार्चला रिलीज होत आहे. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुडाने सावरकरांची मुख्य भूमिका साकारली आहे. रणदीपने त्याचा या चित्रपटातील फर्स्ट लूक जारी केला तेव्हाच लोकं आश्चर्यचकीत झाले होते. मात्र नुकताच रणदीपने जो फोटो शेअर केला आहे तो पाहून चाहत्यांच्या व सावकर प्रेमींच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
View this post on Instagram
रणदीप हुडाने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्याच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत त्याचा लूक पाहून अंगावर काटा आल्याची प्रतिक्रीया दिली. तर काही जणांनी तो फोटो पाहून भावूक झाल्याचे म्हटले आहे.