सनी- अमिषा पोचले सीमेवर

अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर 2’ चित्रपट येत्या 11 ऑगस्ट प्रदर्शित होणार आहे. ‘गदर 2’ च्या निमित्ताने सनी- अमिषा आणि गायक उदीत नारायण अटारी- वाघा बॉर्डरवरील रिट्रीट सेरेमनीला उपस्थित राहिले. त्यांना पाहण्यासाठी हिंदुस्थानी- पाकिस्तानी चाहत्यांनी गर्दी केली.

यावेळी सनी देओल ‘गदर’ मधील तारा सिंहच्या तर अमिषा पटेल सकीनाच्या वेशभूषेत होती. यावेळी उदीत नारायण यांनी ‘घर आजा परदेशी’ हे गीत गायले. त्यावर सनी- अमिषाने ठेका धरला. त्यानंतर सनीने बीएसएफ जवानांचीही भेट घेतली. तसेच रविवारी लोंगोवाला येथे जाऊन माता तनोत देवीचे दर्शन घेतले.