विमानतळावरून 65 लाखांचे सोने जप्त

सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) प्रवाशाला अटक करून  65 लाखांचे सोने जप्त केले आहे. सुबान बशीर अली असे त्याचे नाव आहे. त्याला सोने तस्करीच्या मोबदल्यात 50 हजार रुपये मिळणार होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

सुबान हा शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने ताब्यात घेतले. त्याने शरीरात एका ठिकाणी ते सोने लपवले होते. त्याच्याकडून एकूण 63 लाखांचे सोने जप्त केले. हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने त्याची कसून चौकशी केली. रियाध येथे त्याला व्यक्तीने ते सोने दिले होते. सोने तस्करीच्या मोबदल्यात त्याला 50 हजार रुपये मिळणार होते असे त्याने अधिकाऱ्यांना चौकशी दरम्यान सांगितले. ते सोने तो मुंबईला आल्यावर विमानतळाबाहेर एका व्यक्तीला देणार होता. सुबानला अटक करून न्यायालयात हजर केले होते.