विद्यार्थ्यांवर अंदाधुंद गोळीबार, 8 जखमी तर एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर

गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेतीत विविध भागांमध्ये गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटना ताज्या असतानाचं बसची वाट बघत थांबलेल्या विद्यार्थ्यांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना अमेरिकेत घडली आहे.

अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये सदर घटना दुपारी 3 च्या दरम्यान घडली आहे. सर्व विद्यार्थी 15 ते 17 वर्षांच्या दरम्यान आहेत. फिलोडेल्फियातील नॉर्थइस्ट हायस्कुलचे हे सर्व विद्यार्थी बसस्थानकावर बसची वाट पाहत थांबले होते. याचवेळी काही संशयीत वाहनातून आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांवर अंदाधुंद गोळीबार करायाला सुरुवात केली. विद्यार्थ्यांवर 30 हून अधिक राउंड फायर करण्यात आल्या. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

फिलाडेल्पियाचे पोलीस आयुक्त केविन बेथले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गंभीर घटनेत आठ जण जखमी झाले आहेत. आठ जणांपैकी एक 16 वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला नऊ गोळ्या लागल्या आहेत. तसेच इतरांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.