अमिताभ बच्चन यांच्यावर अँजियोप्लास्टी, रुग्णालयातून डिस्चार्ज

महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर शुक्रवारी अंधेरी येथील कोकिलाबेन रुग्णालयात अँजियोप्लास्टी झाली. अमिताभ यांच्या पायात रक्ताची गुठळी निर्माण झाल्याने उपचार करण्यात आले. पायावरील अँजियोप्लास्टीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे समजते.

रुग्णालयाकडून किंवा बच्चन कुटुंबियांकडून अमिताभ यांच्या अँजियोप्लास्टीविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 81 वर्षीय अमिताभ यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. शुक्रवारी सकाळी अमिताभ ट्विटरवर सक्रीय दिसले. ‘तुम्हा सगळ्यांचे आभार’ असे ट्विट त्यांनी केले होते.

अमिताभ यांच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे तर ‘काल्की 2898 एडी’ हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रजनीकांत यांच्यासोबत ते 33 वर्षांनी एकत्र येणार आहेत. ‘थलायवर 170’ असे या चित्रपटाचे नाव आहे.