भटक्या श्वानांची बिझनेस क्लासमधून सवारी

अमृतसरच्या रस्त्यांवरील दोन भटके श्वान आता चक्क विमानाने कॅनडाला जाणार आहेत…ते देखील बिझनेस क्लासमधून. ऐकून आश्चर्य वाटले ना पण हे खरंय. ऑनिमल वेल्फेअर ऍण्ड केअर सोसायटीच्या सर्वेसर्वा डॉ. नवनीत कौर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 15 जुलै रोजी दोन्ही श्वानांना घेऊन त्या दिल्लीहून कॅनडाला रवाना होणार आहेत. डॉ. नवनीत कौर म्हणाल्या, रस्त्यावरील श्वानांना कुणी वाली नसतो, आम्ही रस्त्यावरील श्वान पाळत नाही. आपल्याकडील श्वान आनंदाने दत्तक घेणारे लोक परदेशात असतात. कारण आपल्याकडील श्वानांची जात अधिक मैत्रीपूर्ण आणि काळजी घेणारी आहे. यामुळेच या श्वानांना कॅनडाला पाठवले जात आहे, तिथे त्यांची चांगली काळजी घेतली जाईल.