लेख – ‘ओपन-बुक’ परीक्षा – किती सोपे, किती कठीण!

>> डॉ. अनिल कुलकर्णी

खुल्या पुस्तकाचा अर्थ असा नाही की, तुम्हाला तयारी करण्याची किंवा अभ्यास करण्याची गरज नाही. तुमची ओपन बुक परीक्षा वेळेवर असेल तर हे आणखी महत्त्वाचे आहे. ओपन बुक परीक्षांसाठी तुम्हाला उच्च पातळीची विचारसरणी वापरण्याची आवश्यकता असल्यामुळे तुम्हाला फक्त तथ्ये किंवा आठवणीबद्दल विचारले जाणार नाही. त्याऐवजी तुम्हाला माहितीची तुलना, विश्लेषण, मूल्यमापन किंवा संश्लेषण करण्यास सांगितले जाईल. तुमचे ज्ञान दाखवण्याचे हे मार्ग अधिक आव्हानात्मक आहेत आणि त्यासाठी आवश्यक आहे की, तुम्हाला सामग्री सखोलपणे माहीत असणे आणि कनेक्शन पाहण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

अंडरस्टॅण्डिंग अ क्वेश्चन इज हाफ ऍन ऍन्सर, असे सॉक्रेटिसने म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट असतील तर व विचारलेल्या प्रश्नांचे आकलन त्यांना झाले तर उत्तर त्यांच्या मनातच असेल. परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना वाचन केल्यानंतर व त्याचे आकलन झाल्यानंतर व उपयोजना करता आल्यानंतरच देता येऊ शकतील.
आजच्या विद्यार्थ्यांमध्ये पाठांतर करण्याची क्षमता आहे, पण त्याचे आकलन व उपयोजन यामध्ये ते कमी पडतात. अनसीन पॅरेग्राफमधील प्रश्नांची उत्तरे द्यायला विद्यार्थ्यांना अवघड जाते. कारण त्यांना तो पॅरेग्राफ व त्याचे आकलन होत नाही.

पुस्तकासहित परीक्षा घेण्यामुळे मुले पाठय़पुस्तक वाचतील हा सकारात्मक बदल नक्कीच घडेल, पण केवळ वाचन उपयोगाचे नाही, तर वाचलेलं जे जे आहे त्याचं आकलन झालं पाहिजे आणि आकलन झालं तरच त्या माहितीचं उपयोजन कुठे करायचं आणि कसं करायचं हे मुलांना समजेल. पुस्तकविरहित परीक्षा मुलांच्या बुद्धिमत्तेपेक्षा पाठांतर, घोकंपट्टी व आठवण्याची क्षमता यांचा कस लावणारी होती. अभ्यास न करणाऱयांसाठी पण कॉपी करून पास होणाऱयांना वरदान होती. आता पुस्तकासहित परीक्षा घेण्याचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

परीक्षेत आतापर्यंत विद्यार्थी फक्त प्रश्नांची उत्तरे लिहीत होती, आता त्यांना एखाद्या प्रश्नाचे उपयोजन, विश्लेषण व त्यावर आपलं मत मांडता येणं आवश्यक ठरणार आहे. वकिलांचा ज्याप्रमाणे अभ्यास असेल तर कोणत्या पुस्तकात कोणत्या पानावर कोणतं कलम, कोणता नियम आहे हे त्याला माहीत असतं. तो संदर्भ घेऊन तो केस लढवतो. विद्यार्थी आज किंवा पाठय़पुस्तकांतून व शिक्षकांनी शिकवलेल्या भागावरच अवलंबून असतात असे नाही, तर पुस्तकांच्या बाहेर जे जे आहे ते, उदा. इंटरनेट विकिपीडिया, प्रसार माध्यमे यांतून ते शिकत असतात. प्रत्येक पाठाच्या खाली आता योजनाचे प्रश्न असतात, पण ते सोडवताना विद्यार्थी किती आकलन उपयोजनाचा उपयोग करतो ते पाहणे महत्त्वाचे आहे. गृहपाठ कॉपी करून किंवा आई-वडिलांनी केलेला असेल तर अशा प्रकारची मुले पुस्तके घेऊनसुद्धा उत्तरे शोधू शकणार नाहीत.

आजची मुले पाठय़पुस्तकें फार कमी वाचतात. पुस्तके वाचलेली असतील तर त्याचा संदर्भ कोठे व कसा घ्यायचा हे कळेल, पण जर पुस्तकाला हातसुद्धा न लावणारे जेव्हा परीक्षेला सामोरे जातात, त्यांचं काय होणार? ‘21 अपेक्षित’वर अवलंबून असणारे, शिकवणीमधील शिकविलेले पाठांतर करून परीक्षेत उत्तर लिहिणारे व चांगले मार्क घेऊन जाणारे आणि पाठांतर करणारे व संकल्पना न समजणारे, पण मेरिटमध्ये येणारे यांचं काय होणार? पुस्तकासहित परीक्षेसाठी आमच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना यासाठी आधी तयार करावं लागेल. काठिण्य पातळीचे प्रश्न तयार करावे लागतील. शिक्षकांना अधिकची प्रश्नपेढी तयार करावी लागेल. मुलांनी नुसतं उत्तर लिहिणं अपेक्षित नाही, तर पुस्तकातल्या संदर्भावरून तो कुठे आणि कसा वापरायचा हे त्यांना कळायला हवं.

एका विषयात पस्तीस मार्क मिळवण्याचे ध्येय असणाऱया विद्यार्थ्यांना हे कितपत पेलवेल? अंतर्गत गुणांच्या कुबडय़ांमुळे विद्यार्थी कसेतरी 35 मार्क मिळवतात. पासचा टक्का वाढण्यासाठी अंतर्गत गुणांची सोय केली जाते. ‘ढ’ मुलालासुद्धा पास करण्यासाठी 20 पैकी 20 अंतर्गत गुण जर दिले जातात, तिथे तो विद्यार्थी पुस्तक असूनही परीक्षेत काय लिहिणार? घोडय़ाला पाण्याजवळ नेता येईल, पण पाणी पिण्याची क्रिया घोडय़ालाच करावी लागेल.

पुस्तक असूनही जर विद्यार्थ्यांना प्रश्न व त्याचे उत्तर लिहिता आले नाही तर व निकालाची टक्केवारी जर घसरली तर त्याला जबाबदार कोण? म्हणून पुस्तकासहित परीक्षेसाठी तयारी झाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी करणे योग्य ठरेल. मुलांना पुस्तके जवळ करावी लागतील. तरच पुस्तकांच्या पलीकडचे जे जे आहे ते त्यांना कळेल.
अनेक संकल्पना पुस्तकाच्या बाहेर मुलांना कळतात, पण त्यासाठी पुस्तकाचा संदर्भ असेल तर त्या संकल्पना लवकर कळतात. म्हणून पुस्तके वाचून त्यातले संदर्भ जीवनात शोधता यायला हवेत.

उपयोजन, मनन, चिंतन यापासून आजची पिढी खूप दूर आहे.
बंद पुस्तकी परीक्षांपेक्षा खुल्या पुस्तकांच्या परीक्षा सोप्या नसतात – अनेकदा त्या कठीण असतात. ओपन बुक परीक्षेसाठी तुम्हाला खरोखर सामग्री समजून घेणे आणि माहिती व सामग्री लक्षात ठेवण्याऐवजी विश्लेषण करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. याचा अर्थ तुम्हाला निश्चितपणे अभ्यास करणे आणि संघटित होणे आवश्यक आहे. कारण तुम्ही फक्त माहिती लक्षात ठेवू शकणार नाहीत. तुम्ही गोष्टी शोधण्यात किंवा प्रथमच साहित्य पाहण्यात परीक्षेचा मौल्यवान वेळ वाया घालवू इच्छित नाही. तुम्हाला वापरण्याची परवानगी असलेल्या सामग्रीसह तुम्हाला व्यवस्थित करणे आवश्यक आहे. ओपन बुक म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आणि तुम्ही काय आहात हे तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला सर्वसाधारणपणे परीक्षेचे स्वरूप आणि लॉजिस्टिक्सदेखील समजून घेणे आवश्यक आहे- परीक्षा बहुविध निवड, समस्या सोडवणे किंवा निबंध आधारित आहे का? हे जाणून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला परीक्षा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल हेदेखील माहीत असणे आवश्यक आहे.

[email protected]