ओपन किचनची सुंदर रचना

>> सुनील देशपांडे, इंटिरियर डिझायनर

स्ट्रक्चरला बदलू नका
आपण आयलँड किचन काऊंटर बनवू शकतो. त्यामध्येही सुंदरसा लुक करू शकतो. हे सगळे करताना लायटिंगचा व फॉल्स सिलिंगचा सुंदर वापर करून घरात एक प्रसन्न प्रफुल्लित वातावरण निर्माण करू शकतो. पण हे करताना आवर्जून ध्यानात ठेवावे की, आपण कुठेही ओपन किचन बनवण्याच्या भानगडीत तांत्रिकदृष्टय़ा कुठेही चुकत नाही आहे ना…म्हणजेच हे करण्यासाठी कुठेही कॉलम वा आरसीसी स्ट्रक्चरला हात लावत नाही ना हे पहा. तसे काही असेल तर ते करून ओपन किचन करण्याच्या भानगडीत पडू नका.

मागील लेखात आपण लिव्हिंग रूमच्या रचनेबद्दल, त्यामधील फर्निचरबद्दल सविस्तर पाहिले. आज आपण लिव्हिंग रूममध्ये ओपन किचन असेल तर काय करावे, कशा प्रकारे रचना असावी, याबाबतीत जाणून घेऊ या.

बऱयाचदा आपण मालिका-सिनेमांत लिव्हिंग रूममधून दिसणारे स्वयंपाकघर (किचन) पाहतो. आपल्या घरातही असेच सुंदर किचन असावे असा विचार मनात येतो, पण मग सगळा पसारा दिसेल व किचनमध्ये हवी असेल तशी स्वच्छता राखता आली नाही तर… मग आपण तो विषय झटकून टाकतो. खरं तर आपणही ओपन कीचनचे सुंदर डिझाइन करू शकतो. अशा पद्धतीने ओपन कीचनचे सुंदर डिझाईन केले तर घर मोठे वाटते.

ओपन किचनची जमेची बाजू म्हणजे आपण पाहुण्यांशी स्वयंपाक करताना गप्पा मारू शकतो. किचनमध्ये काम करणाऱया व्यक्तीला आलेल्या पाहुण्यांशी संवाद साधता येतो. आपण ब्रेकफास्ट टेबल किचनच्या ओटय़ाला लागून बनवू शकतो. टेबल थोडे ओटय़ाच्या उंचीपेक्षा वर ठेवले तर एक वेगळा लुक तयार होतो. सकाळच्या गडबडीच्या वेळेस ब्रेकफास्ट करता करता व स्वयंपाक करताना कुटुंबातील सगळे जण संवाद साधू शकतात.

यालाच लागून जर का कोणाला बार अपेक्षित असेल तर सुंदर बार काऊंटर तयार करू शकतो. बाहेरच्या बाजूला बारच्या खुर्च्या ठेवल्या व थोडा छोटासा आकार दिलात तर ते ओपन किचनला सुसंगत वाटेल.

इंटिरियर करताना कधीही आपण स्ट्रक्चरल चेंज करण्याच्या भानगडीत पडू नये. त्यामुळे हे करताना आपण चुकूनही काही स्ट्रक्चरला हात लावत नाही ना, हे तज्ञाकडून आराखडे निश्चित करण्यापूर्वी माहिती करून घ्या. अशा गोष्टीची काळजी घेतली तर प्रशस्त लिव्हिंग व ओपन किचन यामुळे घरात आल्यावर छान वाटू लागेल. आपसूकच स्वच्छताही राहते. घरातील स्त्राr आपल्या कुटुंबाशी, येणाऱया पाहुण्यांशी, पार्टी-समारंभामध्ये किचनमध्ये काम करत असतानासुद्धा प्रत्येक घडामोडीत सहभाग घेऊ शकते.