आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय कामगार सेना आज साजरा करणार शिवजयंती उत्सव

अखंड हिंदुस्थानचे दैवत, महाराष्ट्र निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार येणारी जयंती भारतीय कामगार सेनेच्या वतीने गुरुवार, 28 मार्चला सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर साजरी करण्यात येणार आहे. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी शिवजयंती उत्सवाला मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांनी केले आहे.

ताडदेव येथे शिवपालखी सोहळा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक 215 आणि ‘ताडदेवचा राजा’ अर्थात ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त ताडदेव येथे भव्य ‘शिवपालखी’ सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीचे आकर्षण छत्रपती शिवरायांची पालखी व भव्य 11 फुटी मूर्ती, ढोल ताशे, तुतारी अशा पारंपरिक पद्धतीने होणार आहे. विभागातील शिवप्रेमी व शिवभक्तांची विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाला शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे. उपनेते अरुण दुधवडकर, माजी नगरसेविका अरुंधती दुधवडकर, शाखा संघटक सुप्रिया शेडेकर, शाखाप्रमुख सिद्धेश माणगावकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.