नरे पार्क मैदानात चालणाऱया मटका जुगारावर कारवाई तिघांविरोधात गुन्हा

परळच्या नरे पार्क मैदानाच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या मटका जुगारावर भोईवाडा पोलिसांनी कारवाई केली. या वेळी तिघांवर कायदेशीर कारवाई  करण्यात आली. परळच्या नरे पार्क मैदानाच्या मोकळ्या जागेत मटका जुगार सुरू असल्याची माहिती भोईवाडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सुभाष बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मोरेश्वर धायगुडे व पथकाने त्या मटका जुगार अड्डय़ावर कारवाई केली. या वेळी मटका चालविणारा फुलचंद गुप्ता तसेच मटका खेळणारे जोसेफ धिवर, रवींद्र नाईक असे तिघे सापडले. या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.