वायू प्रदूषणाची तक्रार करा ‘मुंबई एअर’वर! महापालिकेच्या मोबाईल अ‍ॅपवर मिळणार सुविधा

मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवून त्याला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने एण्ड्रॉईडवर ‘मुंबई एअर’ नावाचे एक विशेष ऑप्लिकेशन विकसित केले आहे. या अ‍ॅपवर प्रत्येक विभागानुसार तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील वायू प्रदूषणाच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्यासाठी संकेतस्थळ (वेबपोर्टल) आणि मोबाईल ऑप्लिकेशन विकसित करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला जनहित याचिकेच्या निमित्ताने दिल्या होत्या. त्यानुसार पालिकेने हे अ‍ॅप विकसित केले आहे. हे  अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे.

– महापालिकेच्या विभाग पातळीवर या तक्रारींची दखल घेत तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यासाठी डॅशबोर्ड विकसित करण्यात आला आहे. प्रत्येक तक्रारीचा ऑनलाईन वेब पोर्टलच्या माध्यमातून डॅशबोर्डवर मागोवा (ट्रक) घेता येईल तसेच तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रारींचे वर्गीकरणही डॅशबोर्डवर पाहता येणार आहे, अशी माहिती उपायुक्त (पर्यावरण) मिनेश पिंपळे यांनी दिली.

– मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून गेल्या 6 महिन्यांमधील सर्व तक्रारी पाहता येतील.

– एखादी नवीन तक्रार दाखल करताना तक्रारीचे स्वरूप, तक्रारीचा तपशील, आपले ठिकाण (लोकेशन), रस्त्याचे नाव, विभागाचे नाव, तक्रारीशी संबंधित छायाचित्र (फोटो) इत्यादी बाबींचा तपशील प्रत्येक नवीन तक्रारीसोबत भरावा लागणार आहे. z प्रत्येक तक्रारीवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तपशीलही मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून वापरकर्त्यांना पाहता येणार आहे. z तक्रार दाखल करतेवेळी वापरकर्त्याला स्वतŠचा पत्ता स्वयंचलित (ऑटो फेच) पद्धतीने किंवा स्वतŠ (मॅन्युअली) दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.