जुलैमध्ये बंपर जीएसटी संकलन

जुलै महिन्यात जीएसटीचे विक्रमी संकलन झाले आहे. जीएसटी सुमारे  11 टक्केहून अधिक जमा झाला असून त्यामुळे सरकारी तिजोरीत 1.65 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. यापैकी 29 हजार 773 कोटी रुपये केंद्रीय जीएसटी, 37 हजार 623 कोटी रुपये राज्य जीएसटी आणि 85 हजार 930 कोटी रुपये आयजीएसटी म्हणून प्राप्त झाले आहेत. यामध्ये आयात केलेल्या वस्तूंवर जमा झालेल्या 41 हजार 239 कोटी रुपयांच्या कराचा समावेश आहे. याशिवाय उपकर म्हणून 11 हजार 779 कोटी रुपये जमा झाले आहेत.