‘जिप्सी’, ‘भेरा’ आणि ‘वल्ली’ कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात!

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्गत कार्यरत असणाऱया महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्स येथील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केटकरिता शशी खंदारे दिग्दर्शित ‘जिप्सी’, श्रीकांत भिडे दिग्दर्शित ‘भेरा’ आणि मनोज शिंदे दिग्दर्शित ‘वल्ली’ या तीन चित्रपटांची निवड झाली आहे.

‘जिप्सी’ ही आयुष्यभर दिशाहीनपणे भटकणाऱया एका भटक्या जमातीतील कुटुंबाची गोष्ट आहे.

‘भेरा’ही कोरोनाकाळात तळकोकणातल्या एका दुर्गम गावात घडणारी दोन निष्पाप जिवांची कथा आहे. तर ‘वल्ली’ या चित्रपटातील कथेचा नायक वल्ली हा जोगता परंपरेचा अनुयायी आहे.  प्राथमिक पुरुषाच्या शरीरात जन्मलेला आणि बहुरूपाने स्वतःला स्त्राr म्हणून दर्शवणारा व्यक्ती. वल्लीला जाणवते की, त्याचा खरा पुरुषार्थ अत्यंत उपेक्षित राहिलाय. शारीरिक हल्ले, सामाजिक उपहास आणि सार्वजनिक छळ सहन करत, वल्ली परंपरेच्या बंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतो आणि शहरी जीवनातील कठोर वास्तवांना तोंड देण्यासाठी तारासोबत प्रवास सुरू करतो.

z फ्रान्समधील कान येथे 14 ते 22 मे या कालावधीत हा महोत्सव संपन्न होणार आहे. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि आंतरराष्ट्रीय दर्शकांनाही मराठी चित्रपटांची भुरळ पडावी यासाठी महामंडळामार्फत 2016 पासून कान महोत्सवातील फिल्म मार्पेटमध्ये मराठी चित्रपट पाठविले जात आहेत. या वर्षी एकूण 23 चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून तीन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.