चांद्रयान 3: प्रज्ञान रोव्हर चीनच्या युटू 2 ला भेटेल का?

भारताच्या चांद्रयान- 3 ला दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून एक आठवडा झाला आहे. चांद्रयान- 3 चा प्रज्ञान रोव्हर दररोज नवीन माहिती पाठवत आहे. प्रज्ञान रोव्हर व्यतिरिक्त, आणखी एका देशाचे रोव्हर सध्या चंद्राच्या पृष्ठभागावर सक्रिय आहे. ज्याचे नाव युटू 2 रोव्हर आहे. हा युटू 2 चीनचा असून जो चीनने आपल्या मून मिशन चांगई 4 अंतर्गत चंद्रावर पाठवले होते.

3 जानेवारी 2019 रोजी चीनचे चाँग ई – 4 हे दक्षिण ध्रुव एटकीन बेसिनमधील वॉन करमनच्या विवरात उतरले होते. चंद्राच्या दूरच्या भागावर नियंत्रित लँडिग करणारे पहिले अंतराळयान होते. नासाच्यामते चीनचा लँडिग निर्देशांक 45.4561 S अंक्षाश, 177.58885 E रेखांश होते. तर विक्रम लँडरचा लँडिंग निर्देशांक 69.367621 अक्षांश, 32.348126 रेखांश होत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्यामते जेथे लँडिंग करण्याची योजना होती तेथेच लँडर उतरले आहे.

चंद्रावर एकाच वेळी दोन रोव्हर काम करण्याची वेळ असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अंतराळ तज्ञ शनमुगा सुब्रमण्यम यांच्यामते चंद्रावर हिंदुस्थान आणि चीनच्या रोव्हर्समधील अंतर सुमारे 1,891 किमी आहे. त्यामुळे प्रज्ञान रोव्हर युटू 2 रोव्हरला भेटेल अशी कोणतीही शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. विक्रम लँडर पासून केवळ 500 मीटरच्या अंतरावरच प्रज्ञान रोव्हर काम करण्यास सक्षम आहे. तसेच चीनचे रोव्हर देखील लँडिग साईट जवळच काम करत आहे.