चांद्रयान 3 च्या यशामुळे चीनला पोटदुखी; हिंदुस्थानचा दावा खोटा असल्याचा कांगावा

हिंदुस्थानचे चांद्रयान 3 ने 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण धुव्रावर यशस्वी लँडिग केले आणि अंतराळ क्षेत्रातील मैलाचा दगड पार केला. हिंदुस्थानच्या या यशाचे जगभरात कौतुक झाले. तसेच चंद्राच्या दक्षिण धुव्रावर यशस्वी लँडिंग करणारा हिंदुस्थान पहिला देश ठरला. मात्र, हिंदुस्थानच्या या यशाने चीनला पोटदुखी सुरू झाली आहे. चीनच्या चांद्रमोहिमेचे संस्थापक ओयांग जियुआन यांनी हिंदुस्थानने चांद्रयान 3 च्या यशाचे केलेले दावे फोल असून हिंदुस्थानचे चांद्रयानने चंद्राच्य दक्षिण धुव्रावर लँडिंग केलेच नाही, असा कांगावा करण्यास सुरुवात केली आहे.

हिंदुस्थानचे चांद्रयानाचे लँडिंग चंद्राच्या दक्षिण गोलार्धात झाले असून हे लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर झाले नसल्याचे चीनने म्हटले आहे. त्यामुळे हिंदुस्थानने केलेले दावे खोटे असून चांद्रयान 3 ची लँडिंग चंद्राच्या दक्षिण किंवा आकर्टिक धुव्राच्या क्षेत्रात झाली नसल्याचे म्हटले आहे. हिंदुस्थानचा रोव्हर 69 अंश दक्षिण अंशांशावर उतरला आहे. हा चंद्राचा दक्षिण गोलार्ध आहे. तर दक्षइण धुव्र 88.5 ते 90 अंशांच्या दरम्यान आहे.

चंद्राचा कल पृथ्वीपेक्षा खूपच लहान आहे. त्यामुळे चंद्राचा दक्षिण धुव्रदेखील 88.5 ते 90 अंशांमध्येच आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्राबाबत मतभिन्नता असली तरी चंद्राच्या दक्षिण धुव्राजवळ हिंदुस्थानच्या चांद्रयानाने यशस्वी लँडिंग केले आहे. ही अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय आणि अतिशय कठीण बाब आहे. त्यामुळे हिंदुस्थानचे यश मोलाचे असल्याचे जगभरातील संशोधकांनी म्हटले आहे.

हिंदुस्थानच्या यशाचे जगभरातून कौतुक होत असताना चीनने हिंदुस्थानचे दावे खोटे ठरवत आपले म्हणणेच खरे असल्याचा कांगावा सुरू केला आहे. मात्र, चीनच्या कांगाव्याला जगभरातून काहीच प्रतिसाद मिळत नसून हिंदुस्थानचे यश उल्लेखनीय असल्याचे जगभरातील संशोधकांनी स्पष्ट केले आहे.