विमानतळावर शॅम्पूच्या बाटलीत 20 कोटीचे कोकेन

 

डीआरआयने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून 19.47 कोटींचे कोकेन जप्त केले. याप्रकरणी सिएरा लिओन देशाची रहिवासी असलेल्या महिलेला डीआरआयने अटक केली. तिने बूट आणि शॅम्पूच्या बाटलीत ते कोकेन लपवले होते. परदेशातून एक महिला कोकेन घेऊन मुंबईत येणार असल्याची माहिती डीआरआय मुंबई युनिटला मिळाली. नैरोबी येथून आलेल्या या महिलेला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले