शाळेतील विद्यार्थिनींशी आक्षेपार्ह कृत्य; आरोपी शिक्षकाला ३ वर्षांची शिक्षा

girl

काही दिवसांपूर्वी गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नगर जिल्ह्यीतील राहुरी तालुक्यामध्ये घडली होती. याप्रकरणी आरोपी शिक्षक मदन रंगनात दिवे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सदर प्रकरणावर जिल्हा व सत्र न्यायाधीस श्रीमती एस.व्ही. सहारे यांनी निकाल दिला. सर्व पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवत 3 वर्ष सश्रम कारावास आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सदर घटना राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत घडली होती. आरोपी शिक्षक मदन रंगनाथ दिवे याने शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीची छेड काढली होती. या घटनेची माहिती विद्यार्थीनीने तात्काळ मुख्यध्यापिकेस दिली. त्यानंतर आरोपी शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे 9 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, 2 पीडित मुली, मुख्याध्यापिका, शिक्षक व तपासी अधिकार यांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला युक्तिवाद व साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी शिक्षकाला शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले.