विमानतळावरून सोने आणि परदेशी चलन जप्त 

सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या तीन दिवसांत आठ कारवाया केल्या. आठ कारवाया करून तीन किलो सोने, आयफोन आणि परदेशी चलन जप्त केले आहे.

विमानतळावर सोने तस्करीचे प्रकार वाढत चालले आहेत. दमण येथून आलेल्या प्रवाशाकडून 1292 ग्रॅम सोने जप्त केले. तसेच कुवेतहून आलेल्या हिंदुस्थानी प्रवाशाकडून सोने जप्त केले. त्याने ते सोने शरीरात लपवले होते. त्यानंतर दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून आयफोन आणि अंतर्वस्त्रात लपवलेले सोने जप्त केले आहे. तर दुबईहून आलेल्या महिलेने चक्क सोने चपलमध्ये विशिष्ट जागा करून लपवले होते. त्या महिलेकडून 240 ग्रॅम सोने जप्त केले आहे. परदेशी चलन तस्करी करणाऱया एका प्रवाशाला सीआयएसएफच्या जवानाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 लाख 18 हजार परदेशी चलन जप्त केले. त्याने ते चलन केबिन बॅगेत लपवून ठेवले होते.