दिल्ली-बाकू विमान उड्डाणानंतर पायलट निलंबित, जाणून घ्या कारण

दिल्लीहून बाकूला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटच्या वैमानिकांना निवलंबित करण्यात आलं आहे. उड्डाण करण्यासाठी आवश्यक एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) मंजुरीशिवाय उड्डाण केलं की नाही याचा तपास नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) करेपर्यंत वैमानिकांना निलंबित करण्यात आलं आहे.

अझरबैजानच्या राजधानीकडे जाणारे विमान 29 जानेवारीला संध्याकाळी 7.38 वाजता निघाले. इंडिगोनं सांगितलं की, या घटनेची सध्या चौकशी सुरू असून आवश्यक ती कारवाई केली जाईल.

अलीकडच्या काही दिवसांत इंडिगोचा समावेश असलेल्या अनेक घटना आणि विमान कंपन्यांवर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण समोर आले आहे. नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो (बीसीएएस) ने इंडिगोला 1.2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता कारण प्रवासी त्यांच्या विलंबित फ्लाइटची वाट पाहत असताना धावपट्टीवर बसून जेवताना दिसले होते.

अभिनेत्री राधिका आपटेसह इतर प्रवाशांनी देखील अत्यंत त्रासदायक अनुभव गेल्या काही दिवसात शेअर केला आहे. एअरलाइन्स रद्द करणे, अवास्तव विलंब आणि आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता न करणं अशी अनेक तक्रारी आल्याचं पाहायला मिळत आहे.