सोन्याच्या मागणीत घट

हिंदुस्थान हा दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक असलेला देश आहे. हिंदुस्थानात सोन्याच्या मागणीत घट झाल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या या पहिल्या तिमाहीत 158.10 टन सोन्याची मागणी नोंदवली गेली आहे. दुसऱया तिमाहीतील मागणीमुळे सोन्याच्या मागणीत झालेली सात टक्के घट ही सध्याच्या सोन्याच्या विक्रमी किमतीमुळे असल्याचे मत डब्ल्यूजीसीचे हिंदुस्थानातील व्यवस्थापकीय संचालक सोमासुंदरम पीआर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे देशातील सोन्याची मागणी 170.7 टनांवरून सात टक्क्यांनी घसरून 158.10 टन झाली आहे.