कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव; 21 हजार पणत्यांची मनमोहक आरास

श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर येथे श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ कुणकेश्वर यांच्या वतीने आयोजित केलेल्या दीपावली पाडवा या दिवशी दीपोत्सवात 21 हजार पणत्यांची मंदिरात व मंदिर परिसरात सजावट करण्यात आली. तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आकर्षक रांगोळ्या, कारंजे,सेल्फी पॉईंट यांनी हा दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष पदाधिकारी विषवस्त देवसेवक यांच्या उपस्थितीत पडवे येथील रुग्णालयाचे प्रमुख डॉ.आर एस कुळकर्णी, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे, उद्योजक एकनाथ तेली व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिर गाभाऱ्यातील दीप प्रजवलीत करून त्यानंतर अन्य पणत्या प्रज्वलीत करण्यात आल्या. दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान असंख्य भाविक भक्तगण पर्यटक उपस्थित होते. या वर्षीचा दीपोत्सव 14 नोव्हेंबर 2023 दिवाळी पाडवा या दिवशी साजरा केला. त्यानिमित्त मंदिर व मंदिर परिसरामध्ये 21000 हजार दिव्यांची मनमोहक आरास केली होती.

विविध प्रकारच्या रांगोळ्या साकारल्या होत्या यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दीपोत्सवाला भेट देऊन कुणकेश्वर सारख्या पर्यटन स्थळाला शासनाने भरघोस निधी द्यावा अशी अपेक्षा देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली. सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये स्वर निषाद मुंबई प्रस्तुत सुमधुर गाण्यांची मैफिल हा सांज संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. मुख्य संकलन हेमंत कुमार तवटे असून यात गायक हर्ष नकाशे, सागर कुडाळकर ,गायक नयन हार्प, ऍड सिद्धी परब सहभागी झाले होते.या संगीत मैफिलीचे निवेदन अक्षय सातार्डेकर यानी केले. तसेच रात्री 8.30 ते 9 या वेळात सन्मान सोहळा व त्यानंतर 9 ते 9.30 पालखी प्रदक्षिणा सोहळा झाला. त्यानंतर सत्कार सोहळ्याने या कार्यक्रमाची सांगता झाली.