एअर इंडिया क्रूसोबत गैरवर्तन, वित्तीय सेवा कंपनीच्या महिला अधिकाऱ्याला विमानातून उतरवले

पहिल्यांदा एअर इंडियात एक अनोखी घटना घडली आहे. एअर इंडियाच्या क्रू मेंबर्ससोबत गैरवर्तन करणे एका प्रसिद्ध वित्तीय कंपनीच्या महिला अधिकाऱ्याला महागात पडले आहे. तिच्या असभ्य वर्तणुकीमुळे एअर इंडियाने तिला विमानातून उतरवले आहे. एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाच्याआधी ही घटना घडली आहे.

मीडिया वृत्तानुसार, मंगळवारी एअर इंडियाच्या दिल्ली-लंडनच्या विमानातील बिझनेस क्लासमध्ये एका वित्तीय सेवा कंपनीच्या प्रमुख विमानातील क्रू मेंबर्ससोबत गैरवर्तन केले. त्यांच्यासोबत हुज्जत घातली. अखेर क्रू मेंबर्सनी याबाबत कॅप्टनला कल्पना दिली. शिवास बिझनेस क्लासमधील सहप्रवाशांनीही तिच्या वर्तणुकीवर आक्षेप घेतला. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अखेर नऊ तासांचा प्रवास लक्षात घेता कॅप्टनने त्या महिलेला विमानातून उतरविण्याचा निर्णय घेतला आणि तिला उतरविले. विमानातून उतरविल्यानंतर प्रवाशाचे चेकइन सामानही खाली उतरवावे लागते त्यासाठी लंडनला जाणारे हे विमानाला एक तास उशीर झाला.

याप्रकरणी आता एअर इंडियाचे प्रवक्ते 5 मार्च 2024 रोजी विमान एआई 161 मध्ये ही घटना घडली आहे. विमानातील क्रू मेंबर्ससोबत वाद घातल्यानंतर कॅप्टनच्या सल्ल्यानुसार बिझनेस क्लासमधून यात्रा करणाऱ्या त्या प्रवाशाला खाली उतरविण्यात आले. एअर इंडिया कायम आपले प्रवासी आणि क्रू मेंबर्स यांच्या सुरक्षेला प्राधान्य देते आणि दिलेल्या नियमांचे पालन करते. विमानातून उतरवल्यानंतर, त्या महिलेने तिला लंडनमध्ये तातडीचे जायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे एअरलाइनला तिने वागणुकीबद्दल लेखी आश्वासन दिल्यानंतर तिला लंडनला जाणाऱ्या पुढील फ्लाइटमध्ये बसवण्यात आले. एअर इंडियाने सांगितले की, आम्ही प्रवाशांच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून विमानाच्या सुरक्षिततेची खात्री करतो. आमच्या फ्लाइटमध्ये बेशिस्त वर्तन स्वीकार्य नाही. आमच्या सर्व प्रवाशांची आणि क्रू मेंबर्सची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. चार तासांच्या प्रतीक्षेनंतर प्रवासी अखेरीस लंडनला जाणाऱ्या पुढील फ्लाइटमध्ये चढले.