डिजिटल मार्केटमधील बडय़ा कंपन्यांची ‘मोनोपॉली’ मोडणार, अॅपल, गुगल अन् मेटाची चौकशी होणार

काही बडय़ा टेक कंपन्यांनी डिजिटल मार्केटवर ताबा मिळवला आहे. याचा फटका लहान कंपन्यांना बसत आहे. या जायंट कंपन्यांची मेनोपॉली मोडण्यासाठी युरोपियन महासंघाने नवा कायदा 2022 साली आणला आहे. डिजिटल मार्केटिंग कायदा असे त्याचे नाव आहे. या कायद्यांतर्गत प्रथमच अॅपल, गुगल आणि मेटा यांसारख्या कंपन्यांची चौकशी होईल.

नियमानुसार अॅप अनइन्स्टॉल करणे, डिफॉल्ट सेटींग चेंज करणे, वेगळे ब्राऊझर, सर्च इंजिन वापरण्यास परवानगी देणे असे पर्याय दिले पाहिजेत. मात्र अॅपल तसे पर्याय देत नाही. जाहिरातमुक्त कंटेटसाठी मेटा कंपनी युजरकडून मासिक शुल्क घेते, याचीही चौकशी होणार आहे. हा तपास 12 महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू राहू शकतो. या कंपन्यांचे जगभरात अब्जावधी ग्राहक आहेत. हा सगळा तपास ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून केला जात आहे.

मार्गेट वेस्टेजर उपाध्यक्ष, युरोपियन युनियन कंपन्या चौकशीच्या फेऱयात
अल्फाबेट, अॅपल, मेटा, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि बाईटडान्स अशी कंपनींची नावे आहेत. पाच अमेरिकेच्या कंपन्या तर बाईटडान्स ही बीजिंगची कंपनी आहे.