दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, हात आणि खुब्याला दुखापत

मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाल्याचं वृत्त आहे. घरात पाय घसरून पडल्याने झालेल्या अपघातात त्यांच्या हाताला फ्रॅक्चर आणि खुब्याला दुखापत झाली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी एक्स पोस्टवरून याची माहिती दिली आहे.

काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईन, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या वळसे पाटील यांच्यावर पुण्याच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. तिथेच त्यांच्याव शस्त्रक्रिया पार पडणार आहे.