बेरोजगार तरुणााई खवळली तर प्रलय येईल, संमेलनाध्यक्ष डॉ. शोभणे यांचा इशारा

>> पंजाबराव मोरे

शालेय विद्यार्थ्यांच्या गोंधळावर उपस्थित मान्यवरांनी दिलेल्या कानपिचक्यांच्या गदारोळात 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उदघाटन सोहळा पार पडला. त्यातच मराठी भाषेची अक्षम्य गळचेपी, राजकारण्यांची मराठी भाषेविषयी अनास्था, बंद पडलेल्या 16 हजार मराठी शाळा, कंत्राटीकरण आणि खासगीकरणाच्या गर्तेत सापडलेला गोरगरीब आणि कामाच्या शोधात वणवण भटकणार्‍या मराठी तरुणाचा किती अंत पाहणार? असा सवाल उपस्थित करत ही बेरोजगार तरुणाई खवळली तर प्रलय येईल असा इशाारा संमेलनाध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांनी सरकारला दिला. दरम्यान, प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री अजित पवार, उदघाटक सुमित्रा महाजन यांच्यासह सर्वच वत्तäयांनी विद्यार्थ्यांच्या गोंधळाबाबत आयोजकांना कानपिचक्या देत विद्यार्थ्यांच्या किलबिलाटात भाषणे उरकली. या प्रकाराने हे संमेलन सारस्वतासाठी आठवणीतील ठरणार असल्याच्या चर्चा रंगल्या.

सकाळी आठ वाजता निघालेली ग्रंथदिंडी आटोपल्यानंतर बहिणाबाई चौधरी मुख्य सभामंडपात उदघाटन सोहळा सुरू झाला. यात संमेलनाध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे, प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री अजित पवार, उदघाटक सुमित्रा महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, स्वागताध्यक्ष अनिल पाटील, महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, माजी संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर आणि महामंडळाचे पदाधिकारी, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना संमेलनाध्यक्ष डॉ. शोभणे म्हणाले की, आजचा मराठी भाषेसंबंधातील आणि तरुणांच्या भवितव्याविषयीचा ज्वलंत प्रश्न मला भेडसावत आहे. आज अपाण मराठीला अभिजात दर्जासाठी धडपडत असताना मराठी भाषा आणि शाळांची अवस्था काय आहे.या शिक्षणव्यवस्थेत गरीब सामान्य माणूस कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी ‘देश म्हणजे देशातील दगडधोंडे नव्हेत, तर देशातील माणसे होत’ हा श्री. म. माटे यांनी वर्षांपूर्वी दिलेल्या इशार्‍याची आठवण करून दिली. मराठी भाषेच्या सुमार अम्यासाला विद्यापीठीय मंडळेच जबाबदार असल्याचे ते म्हणाले.

सीएचबी हा सरकारी उदासिनतेचा कळस

शिक्षणाचा बाजार करणारी मंडळी शिज्ञणव्यस्थेच्या केंद्रस्थानी बसलेली असल्याने गुणवत्ता असलेल्या प्रतिभासंपन्न तरुणांना 10 हजार रुपये मानधनावर सीएचबी म्हणून काम करावे लागते हा सरकारच्या उदासिनतेचा कळस म्हणावा लागेल. हा प्रश्न जर निकाली काढला नाही तर सुशिक्षित तरुण-तरुणी द्या आत्महत्या करू लागतील. याचे खापर कुणाच्या माथ्यावर फोडायचे? असा सवाल उपस्थित करून बेरोजगार तरुणाई खवळली तर प्रलय येईल असा इशारा त्यांनी सरकारला दिला. शिक्षण क्षेत्रात ३५ वर्षे घालविलेला एक प्रतिनिधी म्हणून अतिशय खेदाने ही भीषणता मांडत असल्याचे ते म्हणाले.

महत्त्वाच्या विषयावर लिहिले पाहिजे – पवार

प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भााषणाच्या सुरुवातीलाच मुलांच्या गोंधळावरून आयोजकांना कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले की, अशा वैचारिक कार्यक्रमांना विद्यार्थ्यांना बोलावूच नये. ते सकाळपासून ताटकळत बसल्याने त्यांनी गोंधळ सुरू केला. त्यामुळे साहित्यिकांचे विचार ऐकण्यासाठी आलेल्या रसिकांचा हिरमोड झाला आहे. तसेच या ठिकाणी पुज्य साने गुरुजी यांचे स्मारक उभारण्याची घोषणा करून त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी केली. मात्र हे स्मारक गुरुजींच्या नावाला साजेसं झालं पाहिजे असे ते म्हणाले. शेवटी समााजाला साहित्यिकच घडवत असतात त्यामुळे साहित्यिकांनी महत्त्वाच्या विषयावर लिहायला पाहिजे असे ते म्हणाले.

भाषा आणि भावना महत्त्वाच्या- महाजन

उदघाटक सुमित्रा महाजन म्हणाल्या की, राजकारण्यांनी साहित्य संमेलनाला यायलाच हवे. कारण या ठिकाणी भाषा शिकता व सुधारता येते.तळागाळातील माणसाला पुढे आणायचे असेल तर भाषा आणि भावना महत्त्वाच्या आहेत. मात्र तळागाळातील जनता म्हणताना आपण तळातील संपूर्ण गाळ ढवळून समाज गढूळ तर करत नाही याचा विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी मन शुद्ध असणे गरजेचे आहे. आईचं काळीज असणारा माणूस देशासाठी काहीही करू शकतो असे त्या म्हणाल्या.

मराठी शाळा बंद पडल्या तरी विदेशात मात्र सुरू – केसरकर

यावेळी भाषा आणि शालेयशिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात मराठी शाळा बंद पडल्या असल्या तरी विदेशात मात्र मराठी शाळांची प्रक्रिया रुजत असल्याचा भयंकर खुलासा केला. तसेच विविध साहित्य संमेलनांना किती निधी मंजूर केला याचा जणू पाढाच वाचला. अ. भा. साहित्य समेलनाला 50 लाखांवरून 2 कोटी, जिल्हस्तरीय संमेलनांना 2 लाख, संतसंमेलनांना 25 लाखांचा निधी, मुुंबईत मरिन ड्राईव्हला भाषा भवन तसेच साहित्यिकांसाठी नवी मुंबईत राहण्यासाठी इमारत बांधण्याच्या घोषणा त्यांनी केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी केले. ग्रामविकास ेमंत्री गिरीश महाजन यांचेही यावेळी भाषण झाले. खानदेश ही बहिण्ाााबाई चौधरी, साने गुरुजी, स्मिता पाटील, ना. धो. महानोर यांची भूमी असल्याचे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांचा गोंधळ आणि किलबिलाट

संमेलनाच्या ग्रंथदिंडीसाठी विविध शाळांतील विद्यार्थ्यांना सकाळी 7 वाजेपासून बोलावण्यात आले होते. त्यानंतर ग्रंथदिंडीत 10 वाजेपर्यंत विद्यार्थी थकलेले होते. त्यानंतर 11 वाजता उदघाटन सोहळा सुरू झाला. हा सोहळा दीड वाजेपर्यंत चालला. म्हणजे तब्बल साडेसहा तास विद्यार्थी ताटकळले होते. त्यात साहित्यिकांचे भाषण त्यांच्या डोक्यावरून जात असल्याने प्रास्ताविक सुरू होताच विद्यार्थ्यांची चुळबुळ सुरू झाली. हजारोंच्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांनी किलबिलाट सुरू केला. त्यामुळे वक्यांच्या भाषणाचा आस्वाद कुणालाच घेता आला नाही.