मुंबई विद्यापीठात दुहेरी पदवीचे शिक्षण; अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठासोबत सामंजस्य करार

मुंबई विद्यापीठात आता दुहेरी पदवीचे शिक्षण मिळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार विद्यापीठाने अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. या शैक्षणिक वर्षापासून माहिती तंत्रज्ञान विभागात एम.एस. इन डेटा एनालॅटिक्स या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाच्या दोन सत्रांचे शिक्षण मुंबई विद्यापीठात तर द्वितीय वर्षाच्या दोन सत्रांचे शिक्षण सेंट लुईस विद्यापीठात मिळणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षण आणि इंटर्नशिपही करता येणार आहे.

मुंबई विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठ यांच्यात यूएएस वाणिज्य दूतावास या ठिकाणी या करारावर सह्या करण्यात आल्या. यावेळी मुंबई विद्यापीठाकडून कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्रा. शिवराम गर्जे, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख श्रीवरमंगई आणि सेंट लुईस विद्यापीठाकडून प्रोव्होस्ट मायकेल लेविस, प्रवेश व्यवस्थापन उपाध्यक्ष रॉबर्ट रेड्डी, सहयोगी डीन ट्रॉय हरग्रोव्ह, वरिष्ठ धोरणात्मक सल्लागार सुंदर कुमारसामी, ग्लोबल ग्रॅड इनिशिएटिव्हच्या संचालिका अनुशिका जैन आणि अनन्या कुमार यांच्या समवेत मुंबईतील यूएस कॉन्सुलेटमधील कमर्शियल कॉन्सुल डेव्हिड पासक्विनी, जनरल सांस्कृतिक आणि शैक्षणिक विभाग प्रमुख सीटा रायटर, सार्वजनिक व्यवहार अधिकारी ब्रेंडा सोया आणि यूएस कमर्शियल सर्व्हिसच्या नोएला माँटेरो या उपस्थित होत्या.