अमोल किर्तीकर यांना पुन्हा ईडीची नोटीस

कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे.

पहिल्यांदा जेव्हा ईडीने मला समन्स बजावले होते तेव्हा मी काही कारणास्तव उपस्थित राहू शकलो नव्हतो. तसा मेसेज मी त्यांना केला होता. मी चौकशी टाळत नाही. मात्र माझ्यावर इतरही काही जबाबदारी आहेत. पक्षाने देखील मला जबाबदारी दिलेली आहे. त्या जबाबदाऱ्यांना सध्या मी प्राधान्य दिलं आहे. त्यानंतर मी चौकशीला सामोरं जाईन, असं अमोल किर्तीकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.