माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, रणजीत देशमुख, अर्जुन खोतकरांविरोधात ईडीचे आरोपपत्र

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्यासह काँग्रेस नेते रणजीत देशमुख आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यासह 14 जणांविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये  विकासक जुगलकिशोर तापडीया आणि उद्योजक पद्माकर मुळ्ये यांचाही समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने 24 आणि 25 ऑगस्ट रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. ईडीच्या आरोपपत्रात राम गणेश गडकरी साखर कारखाना, नगर प्रकरणी प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी), प्रदीप देशमुख (काँग्रेस), यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आलाय. जालना को-ऑपरेटिव्ह सहकारी बँक लिमिटेड प्रकरणी अर्जुन खोतकर, मुळ्ये आणि जुगलकिशोर तापडिया यांच्याविरुद्ध आज चार्जशीट दाखल करण्यात आलय. जरांडेश्वर सहकारी साखर कारखाना या प्रकरणात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव जोडण्यात आलं होत. मात्र, अजित पवार यांच्या शपथविधीपूर्वी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे नाव वगळण्यात आले होते.