Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘2 ऑगस्ट’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Wednesday, August 02, 2023)
चांदीच्या भांड्यातील पाणी प्या. आज मौजमजा करण्याचा मूड होईल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. गरजेला जवळच्या लोकांचा सल्ला घ्या. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा कराल. मुलांसाठी वेळ काढाल. आवडत्या व्यक्तिची भेट होईल. नवीन व्यवसाय भागीदारीत सुरू करणे टाळावे लागेल. गुंतवणुकीसाठी वरिष्ठांचा सल्ला घ्या.
शुभरंग : काळा

वृषभ (TAURUS – Wednesday, August 02, 2023)
कॉटनचा पोषाख परिधान करा. यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल. आर्थिक काटकसर करावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. वरच्या पदावरील लोकांची मदत घ्यावी लागेल. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान करा. दिवसाची सुरुवात उत्साहात कराल.
शुभरंग : गुलाबी

मिथुन (GEMINI – Wednesday, August 02, 2023)
सव्वा किलो गव्हाचे पीठ भाजा. त्यात गुळाची पावडर घाला. हे मिश्रण मुंग्यांना खाऊ घाला. मित्र तुमच्या सहनशक्तीची परीक्षा पाहतील. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा कराल. जोडीदाराकडून आवडती भेटवस्तू मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. स्वत:साठी वेळ काढाल. अनावश्यक गप्पा मारू नका. देवळात पांढऱ्या मिठाईचा प्रसाद वाटा.
शुभरंग : आकाशी

कर्क (CANCER -Wednesday, August 02, 2023)
गणपतीला जास्वंदीचे फूल वाहा. जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे ठरवलेली योजना बारगळण्याची शक्यता आहे. स्वत:साठी वेळ काढाल. आजचा दिवस उदासवाणा जाण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. आवडते संगीत ऐकण्यात वेळ घालवावासा वाटेल. जोडीदाराच्या कामामुळे योजना बारगळतील.
शुभरंग : चॉकलेटी

सिंह (LEO – Wednesday, August 02, 2023)
गणपती मंदिरात लाडूचा प्रसाद वाटा. व्यर्थ खर्च करू नका. कामाच्या ठिकाणी कोणीतरी छान ट्रिट देईल. टीव्ही पाहण्यात वेळ वाया घालवू नका. कुणीतरी खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. रिकामा वेळ आवडती कला जोपासण्यात घालवाल. मोगऱ्याचे अत्तर कपड्यांना लावा. सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम पाहाल.
शुभरंग : हिरवा

कन्या (VIRGO – Wednesday, August 02, 2023)
सकाळी उठल्यावर मारुतीचा अकरा वेळा जप करा. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. कुटुंबियांना वेळ द्या. प्रिय व्यक्तिला लाल रंगाचे गुलाबाचे फूल भेट द्या. घरातील लहान मुलांसोबत पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये फिरायला जाल. धार्मिक कार्यात भाग घ्याल.
शुभरंग : मोती

तूळ (LIBRA- Wednesday, August 02, 2023)
दूध आणि दही खाल्ल्याने आरोग्य चांगले राहिल. कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. आयुष्यातील नव्या घडामोडींमुळे कुटुंबात आनंद निर्माण होईल. स्वत:साठी वेळ काढाल. आवडीचा पोषाख परिधान कराल. घरी अचानक पाहुणे येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : राखाडी

वृश्चिक ( SCORPIO – Wednesday, August 02, 2023)
चांदीच्या बांगड्या किंवा कडे हातात परिधान कराल. आयुष्यातील ताणतणावापासून मुक्त व्हाल. शंकराला दह्यादुधाचा अभिषेक घाला. नवीन संकल्पनांवर चिकाटीने काम कराल. रिकामा वेळ घरातील सफाई करण्यासाठी घालवाल. आवडीचा पदार्थ खायला मिळेल. कामातला उत्साह वाढण्याची शक्यता आहे.
शुभरंग : नारिंगी

धनु (SAGITTARIUS – Wednesday, August 02, 2023)
पांढऱ्या रंगाचे कपडे गरजूंना दान करा. छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. आर्थिक तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. क्रिएटिव्ह संकल्पना सुचू शकते. एखादा जुना मित्र घरी येण्याची शक्यता आहे. लाल रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : निळा

मकर ( CAPRICORN – Wednesday, August 02, 2023)
चांगल्या आरोग्यासाठी पितळी भांडी श्री विष्णू किंवा दुर्गादेवीच्या मंदिरात दान करा. कार्यालयातून लवकर घरी जाल. जोडीदार आज अत्यंत उत्साही असेल. घरच्यांना पर्याप्त वेळ द्याल. झोकून देऊन काम कराल. इतरांना समजून घ्याल. काचेच्या बाटलीतले पाणी प्या. घरातील अडगळ वेळच्या वेळी बाहेर काढा. पिंपळाच्या झाडाला पाणी घाला.
शुभरंग : जांभळा

कुंभ (AQUARIUS – Wednesday, August 02, 2023)
कौटुंबिक सदस्यांमधील सकारात्मक भावना वाढवण्यासाठी दूध, खडीसाखर आणि सफेद गुलाब कोणत्याही पवित्र ठिकाणी अर्पण करा. इतरांकडून प्रेरणा घ्याल. कामावर लक्ष केंद्रित करा. परदेशी जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. आराम करण्यासाठी वेळ काढा. आजचा
शुभरंग : केशरी

मीन (PISCES -Wednesday, August 02, 2023)
प्रियकराला लाल रंगाचे कपडे भेट द्या. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे. जोडीदाराच्या वागण्याचा गैरसमज करून घेऊ नका. महत्त्वाच्या व्यक्तिशी भेट होईल. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आवडता पोषाख परिधान करा. कुटुंबात सकारात्मक वातावरण असेल. जुन्या मैत्रिणीची भेट होईल.
शुभरंग : पांढरा