Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘3 ऑगस्ट’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Thursday, August 3, 2023)
मारुतीरायाचे भीमरुपी स्तोत्र वाचा. आर्थिक समस्येवर मात करू शकाल. अनपेक्षित फायदे होण्याची शक्यता आहे. आराध्यदेवतेचे स्मरण करा. सूर्यस्नान करण्याची सवय लावा. आरोग्यात सुधारणा होईल. आपल्या आवडीचे एखादे फुलझाड परसात लावून त्याची निगा राखा. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला सर्व मिळालेच आहे, असा भाव मनात ठेवा. प्रसन्न राहाल.
शुभरंग : काळा

वृषभ (TAURUS – Thursday, August 3, 2023)
एकाग्रतेने सर्व कामे करण्याची सवय लावून घ्यावी लागेल. एकाच वेळी अनेक कामे करू नका. अभ्यासात मन एकाग्र कराल. व्यसने टाळा. मनाजोगी कामे होतील. ब्यूटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढाल. कलेत मन रमवा. नवीन छंदाची जोपासना कराल. सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावून प्रार्थना कराल. कार्तिकेय स्तोत्राचे वाचन करा.
शुभरंग : हिरवा

मिथुन (GEMINI – Thursday, August 3, 2023)
श्रीकृष्णाचे मधुराष्टक म्हणा. सकारात्मक बदल होतील. कारण काहीही असो शांत राहाल. चांगली बातमी कानी येईल. सकाळी हिरव्यागार गवतावरून चाला. डोळ्यांची काळजी घ्या. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. घरी आलेल्या लहान मुलांना त्यांच्या आवडीचा पदार्थ खाऊ घाला. प्रिय व्यक्तिची भेट होईल.
शुभरंग : खाकी

कर्क (CANCER – Thursday, August 3, 2023)
परोपकार करा. गोशाळेत दानधर्म करा. आवडीचा पदार्थ खायला मिळेल. घरात सकारात्मक वातावरण असेल. धार्मिक पुस्तकांचे वाचन करा. नवीन रुमाल खरेदी करून वापरा. हिरव्या कापडात दोन लवंगा बांधून पाकिटात ठेवा. लाल रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : मोती

सिंह (LEO – Thursday, August 3, 2023)
कुलदेवीची आराधना करा. आनंदाची झुळुक यावी, तसा आजचा दिवस जाईल. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. यथाशक्ती दान करा. केलेल्या मेहनतीला योग्य फळे मिळेलच, याची खात्री बाळगा. सौंदर्यप्रसाधनांची खरेदी कराल. झोपताना चटईचा वापर करा.
शुभरंग : पिवळा

कन्या (VIRGO – Thursday, August 3, 2023)
साधना आणि नामजपाला महत्त्व द्या. आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. ‘आपले कोण परके कोण’ हे ठोकर न खाता सहज कळण्याचा सध्या काळ सुरू आहे. फारशी चिंता न करता ध्येयाच्या मागे लागा. कौटुंबिक वातावरणात रमाल. आरोग्याची काळजी घ्या. उष्ण पदार्थांचा आहारात समावेश करा. आवडत्या कला जोपासा.
शुभरंग : आकाशी

तूळ (TULA- Thursday, August 3, 2023)
समाजात मान मिळेल. इतरांचे म्हणणे ऐकून जे स्वत:च्या मनाला योग्य वाटेल ते करा. सात्त्विक वेष परिधान कराल. आहारातील पथ्ये सांभाळावी लागतील. शिवमंदिरात जाऊन शिवपिंडीवर जाऊन बेल वाहा. घरात सायंकाळी भिमसेनी कापराचा धूप करा. घरी आलेल्या अतिथीचा योग्य पाहुणचार कराल. नवीन ओळखी होतील.
शुभरंग : पांढरा

वृश्चिक ( SCORPIO – Thursday, August 3, 2023)
श्रीविष्णुचे दर्शन घ्या. मनासारखे झाले नाही, तर त्रागा करू नका. मनासारखे न होणाऱ्या पण फार मोठ्या नसलेल्या गोष्टीत जास्त मन गुंतवू नका. आजचा दिवस आपल्यासाठी आनंददायी आहे. समाजात मान मिळेल. शिवपिंडीवर जलअभिषेक आणि बेलपत्र वाहा. आहारात खजुराचा समावेश करा. भुकेलेल्याला अन्न खाऊ घाला.
शुभरंग : नारिंगी

धनु (SAGITTARIUS – Thursday, August 3, 2023)
शनि महाराजांचे दर्शन घ्या. शनि स्तोत्र वाचा. आपण वाट पाहात असलेली बातमी कानी पडेल. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा. उगाचच टीव्ही आणि मोबाईल पाहण्यात वेळ वाया घालवू नका. लोकं तुम्हाला मानसन्मान देतील. आवडते पुस्तक वाचण्यात वेळ जाईल. घरी एखाद्या छोट्याशा समारंभाचे आयोजन कराल.
शुभरंग : मोरपिसी

मकर ( CAPRICORN -Thursday, August 3, 2023)
आराध्यदेवतेचे दर्शन घ्या. आहारात बदामाचा समावेश करा. मौजमजा करण्यासाठी सहलीला जाल. आर्थिक मदतीमुळे अडचणींवर मात कराल. घरातील लोकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्याल. जोडीदाराकडून कौतुक होईल. घरात चाफ्याची फुले ठेवा. तुमचे म्हणणे इतरांना पटवून देण्यात वेळ जाऊ शकतो. मित्रमंडळींच्या भेटीगाठी होतील.
शुभरंग : केशरी

कुंभ (AQUARIUS – Thursday, August 3, 2023)
आजचा दिवस लाभदायक आहे. आर्थिक आवक चांगली राहील. मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्याकरिता प्रयत्न करावे लागतील. घरात धातूच्या कासवाची प्रतिकृती ठेवा. काचेच्या हिरव्या रंगाच्या बाटलीतील पाणी प्या. प्रिय व्यक्तीची भेट होईल. लहान मुलांबरोबर खेळण्यात वेळ घालवाल. घरगुती प्रश्नांकडे त्वरित लक्ष द्या. योग्य व्यक्तिकडूनच मार्गदर्शन घ्याल.
शुभरंग : नारिंगी

मीन (PISCES – Thursday, August 3, 2023)
गायीला हिरवा चारा खाऊ घाला. भांडकुदळ स्वभावावर नियंत्रण ठेवा. नातेवाईक अनपेक्षित घरी येण्याची शक्यता आहे. मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. आर्थिक स्थितीकडे लक्ष द्याल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. कष्टाचे चीज होईल. जोडीदार तुमच्या शब्दाला मान देईल.
शुभरंग : पिवळा