गौतम अदानींच्या अडचणी वाढणार; सेबीचा तपास अंतिम टप्प्यात

अदानी-हिंडनबर्ग प्रकरणाचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालायने राखून ठेवला. यापुढे अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी वेळ वाढवून मागणार नसल्याचे सेबीनेच सांगितले. त्यामुळे सेबीचा तपास आता अंतिम टप्प्यात आला असून उद्योजक गौतम अदानी यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. दरम्यान हिंडेनबर्गचा अहवाल पूर्ण सत्य मानता येणार नाही. त्यामुळेच तपास सेबीकडे दिल्याचे न्यायालयाने सांगितले.

गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी सेबी काय करत आहे, असा सवाल अदानी प्रकरणावरील आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विचारला. यावर शॉर्ट-सेलिंगच्या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आल्याचे सेबीचे वकील महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितले. महाधिवक्ता तुषार मेहता यांनीही सेबीला याप्रकरणी तपासासाठी अधिक वेळ देण्याची गरज नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. 24 जानेवारी 2023 रोजी एरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने एका अहवालांतर्गत अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप केले होते. यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती तसेच बाजार भांडवलही तब्बल 150 अब्ज डॉलर्सने कमी झाले होते. याचा शेअर बाजारावर परिणाम होऊन गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले होते.