राज ठाकरे भाजपची तळी उचलायला आलेले, विनायक राऊत यांचा घणाघात

महायुतीला बिनशर्त पाठींबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी कोकणात सभा घेतली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी घेतलेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यावर टीका केली. ‘तुम्हाला बाकं वाजवणारे खासदार हवेत की मोदींच्या मंत्रिमंडळात जाऊन काम करणारे खासदार हवे’, असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या विधानाचा विनायक राऊत यांनी खरपूस समाचार घेतला असून राज ठाकरे भाजपची तळी उचलायला आले होते, असा घणाघात त्यांना केला.

माध्यमांशी संवाद साधताना रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. राज ठाकरे भारतीय जनता पक्षाची तळी उचलायला आले होते. काल त्यांनी रिफायनरी संदर्भात सूर आळवला. रिफायनरी संदर्भफातील स्क्रिप्ट वाचताना त्यांनी एका बाजूला पाहिले असते तर नारायण राणे दिसले असते आणि दुसऱ्या बाजूला पाहिले असते तर रिफायनरीसाठी परप्रांतिय भूमाफियांना जागा मिळवून देणारे सगळे दलाल स्टेजवर दिसले असते, असा हल्लाबोल विनायक राऊत यांनी केला.

बाकं बडवणाऱ्यांनीच देश आणि लोकशाही वाचवली; संजय राऊत यांनी राज ठाकरेंना सुनावले

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही राज ठाकरे आणि भाजपवर हल्लाबोल केला. भारतीय जनता पक्षाचे इंजिन बिघडलेले आहे. त्यामुळे मनसेचे इंजिन घेऊन गाडी परत चालू करायचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)