बायको गरोदर असताना कोट्यधीशाची दुसऱ्या खोलीत अल्पवयीन मुलीसोबत शय्यासोबत

ग्लेन ड्युबिन हे गुंवणूक क्षेत्रातील एक मोठं नाव मानलं जातं. ग्लेन हा कोट्यधीश असून त्याच्याबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. बड्या, आसामी मंडळींना लैंगिक सुखासाठी अल्पवयीन मुली पुरवल्याच्या आरोपाखाली जेफ्री एपस्टीन याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात खटला सुरू आहे. या खटल्यामुळे मोठमोठी नावे समोर येत असून त्यामुळे रोज खळबळ उडायला लागली आहे. ग्लेन ड्युबिन याचेही नाव या खटल्यामुळे समोर आले आहे.

जेफ्री एप्सटीन हा दलाल होता आणि त्याने ड्युबिनला शरीरसुखाची भूक भागवता यावी यासाठी एक अल्पवयीन मुलगी त्याच्या घरी पाठवली होती. ड्युबिनची बायको गर्भवती असल्याने ती एका खोलीत झोपली होती. ती झोपलेली असताना ड्युबिन दुसऱ्या खोलीत अल्पवयीन मुलीच्या शरीराचे लचके तोडत होता. व्हर्जिनिआ गिऊफ्रे असं या तरुणीचे नाव असून तिने नोंदवलेल्या साक्षीत म्हटले आहे की जेफ्री एपस्टीनची प्रेयसी घिसलेन मॅक्सवेलने तिला ड्युबिनकडे पाठवलं होतं. आपल्याला जेफ्री आणि घिसलेनने ड्युबिनसह अनेक नामवंत, प्रतिष्ठीत लोकांकडे शय्यासोबतीसाठी पाठवलं होतं असाही आरोप व्हर्जिनिआने केला आहे. हे सगळे आरोप खोटे असल्याचा दावा ड्युबिन याने केला असून आपण या आरोपांना यापूर्वीच उत्तर दिल्याचे त्याच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

एव्हा अँडरसन ही ड्युबिनची बायको असून ती जेफ्री एपस्टीनची फार जुनी मैत्रीण आहे. 2008 साली ड्युबिनला शिक्षा झाली होती तरीही त्याचे ड्युबिन पतीपत्नीशी असलेले संबंध अजिबात बिघडले नव्हते. जेफ्री एपस्टीनवर अनेक महिलांनी आरोप केले आहेत. आपल्याला प्रतिष्ठी लोकांसोबत शय्यासोबत करण्यासाठी जेफ्रीने आपल्यावर बळजबरी केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. व्हर्जिनिआने आरोप केला आहे की जेफ्रीने तिला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या क्लबमध्ये मसाज करण्याची नोकरी देण्याच्या बदल्यात शय्यासोबत करण्यास भाग पाडलं होतं.