पदवीधर जास्त बेरोजगार

देशात 2014 पासून बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. शिक्षण पूर्ण करूनही लाखो तरुण बेरोजगार होत आहेत. त्यांना नोकऱया मिळत नाहीत. बेरोजगारीमध्ये 10वी आणि 12 वीपर्यंत शिकलेल्या तरुणांच्या तुलनेत पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले तरुण जास्त बेरोजगार आहेत. 10 वी आणि 12 वीपर्यंत शिकलेल्या बेरोजगारांची संख्या 10.3 टक्के आहे, तर बीए, बीएस्सी, बीकॉमची पदवी मिळालेल्या बेरोजगार तरुणांची संख्या 19 टक्के इतकी आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या एका रिपोर्टनुसार, 2023 मध्ये बेरोजगारी दर 7 टक्के होता. यात शहरी भागात 7.70 टक्के तर ग्रामीण भागात 6.0 टक्के बेरोजगारी दर आहे. कोरोना काळातील 8 टक्के बेरोजगारी दर वगळल्यास सध्याचा बेरोजगारीचा दर या दशकातील सर्वात मोठा बेरोजगारी दर आहे.